Translate

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

किल्ला केंजळगड

किल्ला  केंजळगड

पुणे जिल्यातील भोर पासून अत्यंत जवळ असलेल्या केंजळगड हा छोटासा किल्ला आहे. समुद्र सापठीपासून १,३०० मी. उंचीवर असलेला हा किल्ला वाई आणि रायरेश्वरच्या मधील डोंगरांच्या गिरी शिखरांवर आहे. भोरपासून जवळ असलेल्या कोल्रे गावात गेल्यावर तेथून केंजळमाची हा केंजलगडाचा पायथा लागतो. केंजलगडच्या चारही बाजूनी कातळ कडा आहे. अरुंद अशा उभ्या कातळात ५४ पायऱ्या खोदून काढलेल्या आहेत. कातळातील या पायऱ्या हेच या गडाचे वैशिष्ट आहे. डोंगरावर एक पाण्याचं तळं व केंजळाई मातेचे मंदिर आहे. गडावर जे दारुकोठार दिसते. ते दगडात बांधलेले आहे. गडावरून पाचगणी, महाबळेश्वर पठार, रायेश्वराचे पठार व धोम धरणाचा रम्य परिसर दिसतो. इ.स. १६१२ व्या शतकात पन्हाळ्याच्या भोज राजाने हा किल्ला बांधला अशी नोंद आढळते. अनेक वर्षे हा किल्ला ओस पडलेला होता. सन १६५९ मध्ये छत्रपतींनी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून पुन्हा किल्ला वसवला. १६६६ मध्ये आदिलशहाकडे याचा ताबा होता. १६७४ मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. नंतर १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा किल्ला छोटासा असला तरीही त्याच्या नैसर्गिक रचनेमुळे तो सहजपणे कोणाला जिंकणे अशक्य होते. केंजलगडच्या जवळच रायरेश्वराचे देवस्थान असून या मंदिरातील शिवलिंगाच्या साथीनेच छत्रपतींनी स्वराज्यासाठी शपथ घेतली होती. म्हणून हा सर्व परिसर ऐतहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा