Translate

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

किल्ला घोडबंदर

किल्ला घोडबंदर

ठाणे जिल्यातील उल्हास नदीच्या खाडीजवळ घोड्बंदरचा किल्ला आहे. उल्हास नदीच्या तीरावरील डोंगर रांगेच्या खाडीपर्यंत पसरलेल्या सोंडेच्या शेवटी हा किल्ला बांधण्यात आला आहे. येणाऱ्या जाण्याऱ्या गलबतांवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. घोडबंदरच्या वस्तीकडून किल्ल्याकडे जाताना अगोदर गव्हर्नरचा बंगला लागतो. तेथून पुढे सुमारे ९० पायऱ्या चढून गडावर जाता येते. गडावरील अनेक कमानी अत्यंत आकर्षक आहेत. गडावर एक दरबाराचे सभागृह आहे. गडावर बांधलेले बुरुज हे गडाचे वैशिष्ठ आहे. गडावरून उल्हास नदीचे पात्र फार नयनरम्य दिसते.
पोर्तुगीजांच्या ताब्यातील घोडबंदर किल्ला जिंकण्यासाठी छत्रपतींनी प्रयत्न केला होता व अखेर १७३७ मध्ये मराठ्यांचा झेंडा या किल्ल्यावर फडकला. हा किल्ला परत घेण्यासाठी पोर्तुगीजांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. पुढे १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. घोडबंदर हा छोटासा किल्ला असला तरी त्याची डागडुजी करून त्याला पुन्हा पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न पुरातत्व खात्याकडून केले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा