Translate

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

किल्ला सज्जनगड

किल्ला सज्जनगड

समर्थ रामदासांचा निवास आणि समर्थांची समाधी असलेला एक ऐतिहासिक आणि पवित्र गड म्हणजे सज्जनगड. समुद्र सपाटीपासून ९८१ मी उंचीवर असलेला हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून अजिंक्यतारा किल्ल्याच्या जवळ हा किल्ला आहे. गडावर जाताना सुरवातीला छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार लागेत. नंतर दुसरा महादरवाजा लागतो. प्रवेशद्वाराच्या बाजूला वीर हनुमान आणि वराहमुर्ती आहे. गडावर समर्थांना सापडलेल्या आंग्लाई देवीच्या मूर्तीचे मंदिर आहे. तसेच एक मोठा तलाव असून त्याला घोडाळे तलाव असे नाव आहे. श्रीधर कुठी, सोनाळे तळे व मुख्य म्हणजे राम मंदिर याचे दर्शन घडते. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. तलघरामध्ये समर्थांची समाधी आहे. समाधीवर सुंदर मेघडंबरी असून समर्थांच्या पादुकांचेही दर्शन गडावर घडते. मंदिराच्या जवळच समर्थांचा मठ तसेच समर्थ वापरीत असलेले सामानही आपल्याला बघायला मिळते. त्यात प्रामुख्याने पलंग, पिकदाणी, पानाचा दबा, पाण्याचा लोटा व तलवार लपविलेली कुबडी इ. वस्तू आहेत. गडावरील तटाच्या रक्षणासाठी समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचेही दर्शन घडते. साज्ज्न्गादाचे पूर्वीचे नाव ‘आश्वलायन गड’ असे होते. तसेच परळीचा किल्ला म्हणूनही हा किल्ला ओळखला जात असे. १६६२ मध्ये आफ्जाखानाचा मुलगा फाजलखान हा गडाचा किल्लेदार होता. एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर समर्थ या किल्ल्यावर वास्तव्यास आले व संत सज्जनांच्या वास्त्व्याने पुनीत झाल्यामुळे या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे पडले.

1 टिप्पणी: